नवी दिल्ली, दि. २५ [वृत्तसंस्था] :- देशात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे मत नोंदवत केंद्रीय आरोग्य यंत्रणेने देशात अवघ्या २४ तासात ७०० वर ‘कोरोना’ रुग्ण आढळल्याने केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा या राज्यांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
मागील दोन महिन्यांपासून ‘कोरोना’ ने काही देशात डोके वर काढले. जागतीक आरोग्य संघटनेने या विषयी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मागील महिन्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या दुपट्टीने वाढली आहे. ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या जगासाठी परत एकदा डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान देशाच्या केंद्रीय आरोग्य यंत्रणेने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात ‘कोरोना’चे ३ हजार ७४२ सक्रिय रुग्ण आहेत. केरळ राज्यात सर्वाधिक १२८ ‘कोरोना’ बाधितांची नोंद झाली असून कर्नाटकात ९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ‘कोरोना’च्या ‘जेएन-१’ या नव्या विषाणूने बाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. ‘कोरोना’च्या या नव्या विषाणूने केरळ राज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात ही ‘कोरोना’च्या या नव्या विषाणूचा रुग्ण आढळून आला असल्याचे कळते.