Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिक'ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतयं, याला मंत्री कोणी केलं....?'

‘ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतयं, याला मंत्री कोणी केलं….?’

बीड येथील सभेतून जरांगे यांचा टोला

बीड, दि. २३ [प्रतिनिधी] :- येथील जाहीर सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज परत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली असून त्यांनी केलेल्या “ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतयं, याला मंत्री कोणी केलं….मराठा समाजाला बदनाम करणे, एवढ्या एका कामालाच त्या येडपटाने स्वत:ला वाहून घेतले आहे…” या वक्तव्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद नजीकच्या काळात तरी मिटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी सुरू झालेले जरांगे यांचे आंदोलन पाहता-पाहता राजकीय झाले. जरांगेंच्या आरक्षण आंदोलनाने छगन भुजबळ विरोधी, ओबीसी विरोधी आंदोलनाचे रूप घेतले. जरांगेंच्या प्रत्येक सभेतून भुजबळ विरोधी वक्तव्य सुरू झाले. आजही बीड येथील सभेतून तोच प्रत्यय आला. आजच्या सभेतूनही जरांगे यांनी आपल्या भाषणाचा अधिक वेळ भुजबळ यांच्या विरुद्ध बोलण्यातच घालवला. त्यामुळे जरांगे यांचे आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आहे की, भुजबळांची आणि त्यामाध्यमाने राज्यातील शिंदे-भाजप सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी आहे? असा प्रश्न सामान्य जणांना पडत आहे.

दरम्यान आजच्या भाषणातून आरक्षणा विषयी बोलतांना जरांगे यांनी, “आपली एकजूट अशीच ठेवा. आजची सभा म्हणजे महाप्रलय आहे. मराठा शांत आहे, तोपर्यंत आहे पण पेटून उठला तर तो कुणाचच ऐकणार नाही. मराठा आता जागा झाला आहे. तो शांत आहे म्हणजे झोपला आहे, असे नाही. त्यामुळे सरकारने ही झोपेत राहूनये…”असा ईशारा राज्य सरकारला दिला.

‘मुंबई चलो…दि. २० जानेवारी पासून आझाद मैदानावर आमरण उपोषण….’

“सरकारने दिलेला शब्द पाळून मराठा समाजाला अपेक्षीत आरक्षण दिले नाही तर येत्या २० जानेवारी पासून मराठा समाज जी भूमिका घेईल, ती सरकारला पेलणार नाही…” असे म्हणत जरांगे पाटील यांनी आजच्या ईशारा सभेतून सरकारला दि. २० जानेवारी पर्यंतच्या मुदतीची आठवण करून दिली. यावेळी पुढे बोलतांना त्यांनी मराठा समाजाला दि. २० जानेवारी रोजी मुंबईत मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने दिलेल्या शब्दाला जागत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर, आपण आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

लक्षवेधी