इस्लामाबाद, दि. १८ [वृत्तसंस्था] :- मुंबई बॉम्ब स्फोटाचा मुख्य सूत्रधार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद ईब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्याची माहिती समोर येत असून दाऊद बाबतच्या वृत्ताने पाकिस्तानात उद्रेक होऊनये म्हणून दहशतवादी ओसामा बीन लादेन च्या हत्येवेळी पाकिस्तानने जशी इंटरनेट सेवा बंद ठेवून लादेनच्या हत्येचे वृत्त दडवून ठेवले होते, तसेच दाऊद बाबतचे वृत्त दडवून ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकार कडून करण्यात येत असल्याचे कळते.
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान, कॅनडा आणि ईतर देशात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या हत्या सुरू आहेत. काही अज्ञातांकडून भारता विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा सुरू असलेला हा ‘एक कलमी कार्यक्रम’ दाऊदच्या हत्येच्या वृत्तापर्यंत कधी येवून ठेपतो? याचीच वाट तमाम भारतीय पाहत असतांनाच आज पहाटेच दाऊदवर विषप्रयोग झाल्याचे वृत्त सामाजिक प्रसार माध्यमातून येवून ठेपले आणि मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आनंदाची एक वेगळीच लाट उसळली.
दाऊद बाबत आलेल्या वृत्तानुसार दाऊदवर त्याच्या कराची येथील राहत्या घरीच विषप्रयोग झाला. दोन दिवसांपूर्वीच त्याच्यावर हा जीवघेणा विषप्रयोग झाल्याने पाकिस्तान सरकारने मागील दोन दिवसांपासून संपूर्ण कराची शहराला लष्करी छावणीचे रूप दिले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तासह कराचीत लष्कर तैनात करून संपूर्ण शहरातील रहिवाशांची पोलिसी खाक्यात चौकशी सुरू असल्याचे कळते. पाकिस्तानसाठी अडचणीचे म्हणजे, दाऊदवर झालेल्या या जीवघेण्या विषप्रयोगाची माहिती जगाला देणे दूरच, दाऊदवर असे काही घडल्याचे ही पाकिस्तान मान्य करू शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानात राहत नसल्याचे पाकिस्तान सरकारने वारंवार अधिकृतपणे जाहीर केले आहे.
दरम्यान दाऊदवर झालेला हा विषप्रयोग लक्षात येईपर्यंत दाऊदची तब्येत चांगलीच बिघडल्याने त्याच्यावर कराची येथील त्याच्या राहत्या घराच्या आवारातीलच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. पण त्याची प्रकृती कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे कळते. दाऊद बाबतची ही माहिती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या सिंडीकेट मधून बाहेर आली असल्याने ही माहिती खरी असून दाऊद ईब्राहिम शेवटच्या घटका मोजत असल्याच्या वृत्ताला आता फक्त अधिकृत दुजोरा मिळणे बाकी असल्याचे बोलल्या जात आहे.