Monday, December 23, 2024
Homeराजकीय'बेवड्याच्या पिऊन किडण्या गेल्या आणि आम्हाला शिकवतो...'

‘बेवड्याच्या पिऊन किडण्या गेल्या आणि आम्हाला शिकवतो…’

छगन भुजबळांची जरांगेंवर जहरी टीका

भिवंडी, दि. १७ [प्रतिनिधी] :- ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी “बेवडा पिऊन-पिऊन किडण्या गेल्या आणि येवल्यात येऊन आम्हाला शिकवतो, धमकावतो. शिव्या देतो. जीवे मारण्याच्या धमक्या देतो…” अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली.

आज इथे पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळ यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. या भाषणातून त्यांनी मनोज जरांगे यांच्या सोबतच आपल्या सरकारचा ही खरपूस समाचार घेतला. आपले सरकार जरांगेच्या झुंडशाहिला घाबरत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा झुंडशाहिला न घाबरता राज्य सरकारने योग्य आणि ताठर भूमिका बजावायला हवी, असे मत यावेळी मांडले. “इंग्रजांच्या काळात महात्मा गांधींच्या उपोषण स्थळी इंग्रज जसे भेटी द्यायचे, तसे सरकार मधील मंत्री जरांगेच्या उपोषण स्थळी हजरी लावत असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. तो आमची घरे जाळतोय, आमच्या कार्यालयावर हल्ले करतोय, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. आम्हाला गांव बंदी घालतो आणि रोहित पवारला पायघड्या घालतो. आमच्या बैठका उधळून लावतो. त्याच्या बैठका, सभा असल्या की शाळांना सुट्या दिल्या जातात…काय चालले काय हे….? का ह्या झुंडशाहिला पोसले जात आहे….? कुणाला काय करायचे ते करुद्या…निवडणुका आल्या की, ओबीसींना असा त्रास देणाऱ्यांना, ओबीसींच्या जिवावर उठणाऱ्यांना असा धडा शिकवा की, त्यांनी परत ओबीसींच्या नादी लागण्याची हिम्मत केली नाही पाहिजे….” अशा जहाल शब्दांत भुजबळांनी आज जरांगेंच्या आंदोलनाबाबत भूमिका मांडली.

यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना भुजबळ यांनी, “सरकारने मराठ्यांना सरसगट आरक्षण दिल्यास ओबीसीचा सरपंच ही होणार नाही. आधीच ओबीसींच्या ताटातले हिसकावून खाण्याचे प्रकार सुरू आहेत. आता परत ते म्हणतात त्या प्रमाणे घडल्यास आपले सामाजिक अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी उठा, जागे व्हा. गावोगावी मोर्चे काढा, आंदोलने करा. जशास तसे उत्तर द्या.” असे वक्तव्य केले. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू झालेला जरांगे विरुद्ध भुजबळ, ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद अधिकच वाढत जावून राज्यातील शांतता आणि सुरक्षीतता धोक्यात येण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा

लक्षवेधी