Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकधक्कादायक : दहावीच्या मुलीवर अत्याचार, दोन तासानंतर आली शुद्धीवर

धक्कादायक : दहावीच्या मुलीवर अत्याचार, दोन तासानंतर आली शुद्धीवर

चिपळूण, दि. १७ [प्रतिनिधी] :- निसर्गाच्या मनमोहक कुशीत बसलेले, ऐतिहासिक, धार्मिक महात्म्य असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे गांव आज एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने चर्चेत आले.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोकरे गावातील सदर अल्पवयीन मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. मागील काही दिवसांपासून घटनेतील आरोपी मुलगा संबंधीत मुलीस त्रास देत असे. दरम्यान सदर मुलगी शाळेला निघाली असतांना संबंधीत आरोपी मुलाने त्याच्या मित्रासह संगनमत करून तीला पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बळजबरी केली. या घटनेचा आघात होऊन सदर मुलगी जागीच बेशुद्ध झाली. जवळपास तास-दोन तासानी शुद्धीवर आल्यानंतर तीने घर गाठले.

तिची अवस्था पाहून भेदरलेल्या तीच्या पालकांनी लगेच सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीने या प्रकरणी दिलेल्या पोलीस तक्रारी नुसार पोलिसांनी दोन आरोपी शाळकरी मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केला आहे. घटनेतील पिडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कळते.

हेही वाचा

लक्षवेधी