Sunday, December 22, 2024
Homeकरमणूकतब्बल दहा मिनिटे बंद पडलं होतं श्रेयस तळपदेच हृदय

तब्बल दहा मिनिटे बंद पडलं होतं श्रेयस तळपदेच हृदय

मुंबई, दि. १६ [प्रतिनिधी] :- अभिनेता श्रेयस तळपदेच्या आयुष्याबाबत एक चमत्कार घडल्याचे समोर आले असून श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचे हृदय तब्बल १० मिनिटे बंद पडल्यानंतरही त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या बाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींना माहिती देतांना संबंधीत डॉक्टरांनी हा एक दैवी चमत्कारच असल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी श्रेयस तळपदे यास हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करेपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे बंद पडलेले हृदय परत सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या उपचार पद्धतीचा प्रयोग केल्यानंतर श्रेयसच्या हृदयाने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. हा एक प्रकारे आरोग्य क्षेत्रातील दैवी चमत्कारच असल्याचे म्हटल्या जात आहे. दरम्यान त्याच्यावर लगेच अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने ‘एक्स’ सामाजिक प्रसार माध्यामावर केलेल्या एका पोस्ट मधून दिली आहे.

हेही वाचा

लक्षवेधी