बंगळुरू, दि. २९ [वृत्तसंस्था] :- ‘लगान’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुराज यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून चित्रपट सृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले ‘लगान’ सारख्या अनेक चांगल्या कलाकृती सिनेरसिकांना दिल्या. होते. ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, ‘जंजीर’ आणि ‘गली गली चोर है’ या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले. मृत्यूसमयी ५३ वर्षे वय असलेल्या गुरुराज यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच हिन्दी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्यांनी, दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.