Sunday, December 22, 2024
Homeकरमणूक'पुष्पा' ला अटक : फायर नही, गुन्हेगार

‘पुष्पा’ ला अटक : फायर नही, गुन्हेगार

हैद्राबाद, दि. १३ [प्रतिनिधी] :- ‘पुष्पा…फ्लावर नही, फायर हूं मै….’ या आणि अशा डायलॉग ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणाऱ्या अॅक्शन फिल्म ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा-२’ चा नायक अल्लू अर्जुन ला आज हैद्राबाद पोलिसांनी चेंगराचेंगरी व दोन व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणी अटक केली आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या या अटकेने चित्रपट श्रूष्टीत खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार हैद्राबाद येथील संध्या थिएटर मध्ये दि. ०४, बुधवार रोजी ‘पुष्पा-२’ चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या शो ला स्वत: अल्लू अर्जुन उपस्थित होता. चाहत्यांमध्ये अल्लू अर्जुन च्या भेटीसाठी एकच झुंबड उडाली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू होवून ईतर काहीजन जखमी झाले होते. याप्रकरणी मयत व्यक्तिच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीनुसार अल्लू अर्जुन आणि ईतर तीन जणांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १०५ अंबू ११८ [१] नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन ने सदर गुन्हा रद्द करण्याबाबत तसेच अटक करण्यात येऊनये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. सदर दुर्घटनेट मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा ही अल्लू अर्जुनने केली. पण घटनेचे गांभीर्य, वाढता रोष लक्षात घेवून हैद्राबाद पोलिसांनी आज अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक केली. या अटकेने दक्षीण भारतीय चित्रपट श्रूष्टीसह संपूर्ण सिने जगतात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

लक्षवेधी