Sunday, December 22, 2024
Homeदेश-विदेश'एनआयए'च्या छाप्यात भिवंडी चे हमास कनेक्शन उघड

‘एनआयए’च्या छाप्यात भिवंडी चे हमास कनेक्शन उघड

भिवंडी, दि. १० [प्रतिनिधी] :- देशद्रोही कृत्यांना आवर घालण्यासाठी सतर्क राहणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने [एनआयए] आज सकाळी कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी धाडी टाकल्या. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, ठाणे ग्रामीण आणि भाईंदर परिसरात ‘एनआयए’ने टाकलेल्या या छाप्यांची एकूण संख्या ४३ एवढी आहे. ‘एनआयए’ने भिवंडी येथे टाकलेल्या छाप्यातून भिवंडी चे हमास कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

या बाबत ‘एनआयए’कडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथील छाप्यात मुंबई बॉम्ब स्फोटातील साकीब नाचन या आरोपी कडून जवळपास ४० भ्रमणध्वनी, मोठी रोकड, हमास चे झेंडे आणि काही शस्त्रे जप्त करण्यात आली. साकीब नाचन हा मुंबई बॉम्ब स्फोटातील एक आरोपी असून तो परत देशविघातक कारवायात सक्रिय झाला असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती. त्यानुसार ‘एनआयए’ने ही छापेमारी केली असता साकीब महाराष्ट्रासह कर्नाटक आणि ईतर काही राज्यात ‘आयएसआयएस’च्या विचारसरणीचा प्रसार करत असल्याचे उघड झाले आहे.

साकीब नाचन ने महाराष्ट्रासह ईतर काही राज्यात ‘आयएसआयएस’चे नेटवर्क उभारले. या नेटवर्क च्या माध्यमातून तो हमाससाठी निधी उभारण्याचे काम करत भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत असल्याचे प्रबळ पुरावे ‘एनआयए’च्या हाती लागले आहेत. या प्रकरणी ‘एनआयए’ने साकीब नाचन याच्यासह १४ संशयीत दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे ही कळते.

हेही वाचा

लक्षवेधी