नागपूर, दि. ०७ [प्रतिनिधी] :- ठाकरे सरकारच्या काळात देशभरात गाजलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सलियान प्रकरणातील संशयीत आरोपी म्हणून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची आज विशेष तपास पथकाकडून [एसआयटी] चौकशी होणार असल्याचे कळते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार ठाकरे सरकारच्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा आकस्मिक मृत्यू झाला होता. सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी संशयीत अवस्थेत आढळून आला. त्यामुळे राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली होती. राजपूत याचा मृत्यू आत्महत्येचा प्रकार नसून हत्येचा प्रकार होय, अशा चर्चा ही त्यावेळी सिने जगतात रंगल्या. यास दुसरे कारण असे होते की, अभिनेता राजपूतच्या संशयीत मृत्यूच्या काही दिवस आधीच त्याची सेक्रेटरी दिशा सलियान हीचा ही संशयीत मृत्यू झाला होता.
दिशा सलियानच्या मृत्यूबाबत प्राथमिक माहिती अशी समोर आली होती की, तीने तिच्या राहत्या घराच्या छतावरून उडी घेवून आत्महत्या केली. पण प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आणि तिच्या मृत्यूबाबत काही राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपानुसार दिशा सलियानचा मृत्यू घडला, त्यावेळी तिच्या घरात एक पार्टी सुरू होती. धक्कादायक म्हणजे त्या पार्टीत स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित होते. दिशा सलियानच्या मृत्यूचे सत्य अभिनेता सुशांतसिंह यास माहीत होते, म्हणून त्याचा ही खून करण्यात आला, असे आरोप या दोन सेलिब्रेटीच्या संशयीत मृत्यूबाबत ही झाले.
परिणामी या दोन आकस्मिक मृत्यूच्या घटनांनी तत्कालिन ठाकरे सरकारची प्रतिमा जनमानसात प्रचंड वाईट झाली. या दोन्ही आकस्मिक मृत्यूच्या घटनांबाबत राणे पिता-पुत्र आणि ईतर काही राजकीय व्यक्तींनी प्रसार माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार आरोप केले. एवढेच नाहीतर काही संदर्भ-पुरावे सादर करून राजकारण्यांनी सामाजिक कार्यकर्त्याला पुढे करून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका ही दाखल केली.
सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिका कर्त्याच्या वकिलाच्या वतीने जे दावे करण्यात आले, त्याधारे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एक ‘एसआयटी’ ही स्थापन करण्यात आली. पण काही कारणाने आदित्य ठाकरेंची चौकशी सुरू करण्यास मात्र दिरंगाई झाली. दरम्यान नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सलियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. या बाबीची दखल घेवून या प्रकरणातील संशयीत आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या ‘एसआयटी’ चौकशीस आज सुरुवात होऊ शकते, असे बोलल्याजात आहे. पोलीस यंत्रणेकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.