Friday, April 4, 2025
Homeअर्थभारतीय शेअर बाजारात तेजी कायम, निफ्टीने गाठला विक्रमी टप्पा

भारतीय शेअर बाजारात तेजी कायम, निफ्टीने गाठला विक्रमी टप्पा

मुंबई, दि. ०१ [प्रतिनिधी] :- आजचा ‘फ्रायडे’ शेअर बाजाराच्या दृष्टीने ‘गुड फ्रायडे’ ठरला. आज सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याने निफ्टीने १५५ अंकांची उसळी घेत २० हजार २२२ चा पहिला उच्चांक मोडीत काढून २० हजार २८८ चा नवा उच्चांक गाठला. तर सेंसेक्सने ही जवळपास ५०० अंकांची उसळी घेत तेजीची घोडदौड कायम राखली. बँकिंग क्षेत्रातील तेजीने बँक निफ्टी ३३२ अंकांनी वधारून ४४ हजार ८१४ अंकांवर बंद झाला.

भारतीय अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेली योग्य दिशा, अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आलेली जिडीपी ची आकडेवारी, पाश्चिमात्य देशातील अर्थव्यवस्थांना आलेली मरगळ, पाश्चिमात्य गुंतवणूक दारांची भारतीय शेअर बाजारात वाढलेली गुंतवणूक, हमास-इस्त्रायल युद्धाची कमी झालेली भीती ही भारतीय शेअर बाजारातील या ऐतिहासिक तेजी मागील प्रमुख कारणे असल्याचे बोलल्याजात आहे.

हेही वाचा

लक्षवेधी