नवी दिल्ली, दि. ३० [वृत्तसंस्था] :- जगातल्या विकसीत देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही भारतीय अर्थव्यवस्थेची विकासाची गती अधिक असून भारतीय अर्थव्यवस्थेने नुकताच ०४ ट्रीलीयन डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या या उल्लेखनीय गतीचे कौतुक जगभरातील अर्थशास्त्रज्ञा कडून करण्यात येत आहे. अर्थव्यवस्थेने गाठलेल्या या ऐतीहासिक उद्दिष्टाला अधिक संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हीजन इंडिया-२०४७’ सादर करणार असल्याची माहिती नीती आयोगाचे अध्यक्ष बीव्हीआर सुब्रमन्यम यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देतांना सुब्रमन्यम यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी अर्थात २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती ट्रीलीयन डॉलरची असेल? भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची विकासाची गती कशी कायम ठेवायची? या विषयीचे भाष्य असेल, मार्गदर्शन असेल, व्यूहरचना असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘ती’ अर्थव्यवस्था किमान ३० ट्रीलीयन डॉलरची असेल, असे ही सुब्रमन्यम यांनी यावेळी सांगितले.