Sunday, December 22, 2024
Homeअर्थसोन्याच्या दराला उच्चांकी झळाळी !

सोन्याच्या दराला उच्चांकी झळाळी !

नवी दिल्ली, दि. ३० [प्रतिनिधी] :- देशात आज सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून सोन्याच्या दराला प्राप्त झालेल्या या झळाळी मागे जगभरातील बँकांनी सोने खरेदीवर दिलेला भर, डॉलर मधील गुंतवणुकीत वाढलेले धोके, जागतिक मंदीचे सावट, जागतिक बाजार पेठेतील वाढती अनिश्चितता अशी कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. कारणे कोणतीही असोत सोन्याचे दर मात्र रोज वाढतच आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या दर वाढीने सोन्याच्या दराचा सर्वकालिन उच्चांक गाठला. आज सोन्याचे दर प्रति तोळा ६२ हजार ८२५ रुपये आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी