मुंबई, दि. २९ :- दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाल्य आणि तारुण्य अवस्थेतील गुणांवर प्रकाशझोत टाकणारी ‘अटल’ ही मालिका लहान मुलांना प्रोत्साहन देणारी आणि राजकारणातील तरुणांना संयम, निष्ठेचे धडे देणारी मालिका ठरणार असल्याचे बोलल्याजात आहे. अँड टीव्ही वर प्रदर्शीत होणारी ही मालिका भारताच्या राजकीय इतिहासावर प्रकाश टाकणारी मालिका म्हणूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी मालिका ठरणार आहे. या मालिकेत अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकाराने आपल्या सशक्त अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत.