Monday, December 23, 2024
Homeकरमणूकनिर्मात्यांनी जाहीर केली 'वार-२' ची प्रदर्शन तारीख

निर्मात्यांनी जाहीर केली ‘वार-२’ ची प्रदर्शन तारीख

मुंबई, दि. २९ [प्रतिनिधी] :- अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ च्या ‘वार’ चित्रपटाने २०१९ मध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल ‘वार-२’ च्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या चित्रपटात टायगर श्रॉफ दिसणार नसून त्याच्या जागी दक्षीनात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर चित्रपटात दिसणार आहे. हिन्दी भाषिक सिनेरसिकांसह दक्षीन भारतीय सिनेरसिकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी हा बदल केला असल्याचे कळते. चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांतच सुरुवात होणार असून हा अॅक्शन पट ऑगस्ट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळते.

हेही वाचा

लक्षवेधी