मुंबई, दि. २९ [वृत्तसंस्था] :- प्रेक्षकांच्या मनावर कायम असलेले ‘कांतारा’चे गारुड ‘कॅश’ करून घेण्याच्या दृष्टीने चित्रपटाच्या निर्मात्याने ‘कांतारा’च्या प्रीक्वेल ची तयारी सुरू केली असून ‘कांतारा’च्या प्रीक्वेलचा टीजर निर्मात्यांनी नुकताच सामाजिक प्रसार माध्यमांवर प्रसारीत केला. ‘कांतारा’च्या या प्रीक्वेलला अवघ्या काही तासांतच १२ लाखांवर व्ह्यूवर्स मिळाले.
‘कांतारा’च्या या प्रीक्वेल चे नाव ‘कांतारा अ लेजंड’ असे असून या प्रीक्वेलच्या प्रसारीत करण्यात आलेल्या टीजर मध्ये चित्रपटाचा नायक ऋषभ शेट्टी हिंस्त्र अवतारात दिसून येत आहे. शेट्टीचा हा लुक चित्रपट चाहत्यांना आकर्षित करणारा असा आहे, चित्रपटाविषयीचे आकर्षण वाढवणारा आहे. त्यामुळे या टीजरला व्ह्यूवर्स वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी आलेल्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसरवर चांगलीच कमाई केली होती. तशीच कमाई ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल करणार असल्याचेच हे संकेत होत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.