मुंबई, दि. २९ [प्रतिनिधी] :- राज्य शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल स्पर्धेचे यंदा दिमाखदार आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार असून या खेळासह ईतर काही खेळांचे आयोजन ही या करंडकात होणार असल्याचे कळते. खेळाडूंना या स्पर्धेकडे आकर्षित करण्यासाठी प्रती स्पर्धा ७५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.