Monday, December 23, 2024
Homeक्रीडामालिका विजयावर 'सूर्या'ची नजर

मालिका विजयावर ‘सूर्या’ची नजर

गुवाहटी, दि. २८ [वृत्तसंस्था] :- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील आजचा सामना अत्यंत महत्वाचा सामना माणल्याजात असून आजचा सामना जिंकून ही मालिका खिशात घालण्याच्या दृष्टीने भारतीय संघ सज्ज झाला आहे. ०५ सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने जिंकून भारतीय संघाने आधीच आघाडी घेतली आहे.

सूर्यकुमार यादव च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगीरी करत ऑस्ट्रेलियाला मालिकेत मागे ढकलले आहे. आता आजचा सामना जिंकून विजयाची हॅट्रीक साधत मालिका विजय मिळविण्याच्या हेतुणेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्यादृष्टीने सूर्यकुमारने एक विशेष व्यूहरचना आखली असल्याचे कळते.

गुवाहटीच्या ज्या बारसापारा मैदानावर आजचा सामना होणार आहे, त्या मैदानावर नेहमी चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. कारण येथील खेळपट्टी ही फलदाजांच्या दृष्टीने अत्यंत चांगली खेळपट्टी असल्याचे म्हटल्याजाते. गोलंदाजांची कत्तल घडवून आणणारी ही खेळपट्टी असून फॉर्मात असलेल्या भारतीय फलंदाजांच्या दृष्टीने ही एक चांगली संधी असल्याचे बोलल्याजात आहे. विशेष म्हणजे या मैदानावर आत्तापर्यंत एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. आजपर्यंत इथे फक्त टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झालेले आहेत. अशा या फलंदाज पोषक मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामण्यास सायंकाळी ०७ वाजता सुरुवात होणार आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी