Monday, December 23, 2024
Homeराजकीयसरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल-रविकांत तुपकर

सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल-रविकांत तुपकर

मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सध्या बुलढाणा जवळील सोमठाण्यात आमरण उपोषणास बसलेले असून ते आज सोयाबीन, कापूस प्रश्नावर मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. “या मोर्चाच्या माध्यमाने मंत्रालयात घुसून आपण कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू.” असा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे.

या आंदोलनास राज्य सरकारने पोलिसांकरवी बळाचा वापर करून विरोध केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. सरकारने बळाचा वापर करून आम्हाला रोखल्यास रक्तपात होईल, असा ईशारा वजा गंभीर धमकी तुपकर यांनी दिली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात आज नेहमीपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तुपकर असलेल्या सोमाठाणा आणि बुलढाणा परिसरात ही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे कळते. तुपकरांनी दिलेल्या धमकी वजा इशाऱ्याची गंभीर दखल घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा

लक्षवेधी