रियाध, दि. २९ [वृत्तसंस्था] :- क्रिस्टीयानो रोनाल्डोने एफसी चॅम्पियन्स लीगमध्ये इराणच्या क्लब विरुद्ध आपल्या प्रतिमेला साजेसे प्रदर्शन केले. वैशिष्ट्य म्हणजे विजयासाठी सर्व काही वृत्तीने आक्रमकपणे खेळणाऱ्या रोनाल्डोने या सामन्यात चमत्कारीकपणे खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत पेनल्टी नाकारुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नासरच्या कॉन्टर अटॅक दरम्यान बॉक्सच्या आत खेळाडूच्या पाय रोनाल्डोला लागला व तो पडला. त्यावर रेफ्रीनी अल नासरच्या क्लबला पेनल्टी दिली. पण रोनाल्डो तात्काळ रेफ्रीकडे गेला आणि त्याने निर्णय मागे घेण्यास सांगितले. रोनाल्डोच्या या कृतीने, त्याने दाखविलेल्या या खिलाडू वृत्तीने जगभरातील फुटबॉल प्रेमी अवाक झाले. कारण आजपर्यंत कधीही अशी खिलाडूवृत्तीसाठी रोनाल्डोने दाखविली नाही.