मिझोराम, दि. २७ [वृत्तसंस्था] :- मागील २४ तासांत जगाच्या नकाशात एका नव्या देशाची भर पडली असून भारत-म्यानमार सीमेवर ‘चीनलँड’ नावाचा एक नवा देश रात्रीतून उगवल्यासारखा उगवला आहे. भारताच्या दृष्टीने चीनकडून सुरू असलेल्या डोकेदुखीत वाढ करणारी ही घटना असली तरी विदेश मंत्रालयाकडून ही घटना म्यानमारच्या हद्दीत घडली असल्याचे स्पष्ट करत याबाबत जाहीरपणे विशेष चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही.
प्राप्त माहितीनुसार म्यानमार मधील सैन्याशी लढा देणाऱ्या लोकशाही वादी चीन डिफेन्स जॉइंट फोर्सेसने भारत म्यानमार सीमेवरील म्यानमार हद्दीतील तिआऊ-खाव्मावीवर ताबा मिळवत हा नवा देश स्थापन केला आहे. म्यानमार मधील ह्या भागावर ताबा घेवून चीनच्या लोकशाही समर्थक जॉइंट फोर्सने तेथील स्थानिक प्रशासन ही ताब्यात घेतले असल्याचे कळते. त्यांनी आपल्या नव्या राष्ट्रध्वजाला मान्यता देत आपल्या नव्या देशाच्या सीमेवर अर्थात भारत-म्यानमार सीमेवर ते फडकवत ‘वेलकम टू चीनलँड’ अशी स्वागत कमानही उभारली आहे.