Monday, December 23, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे-अजित दादात शीतयुद्ध सुरूच, आता लोकसभेच्या जागा वाटपावरून पडली ठिणगी

एकनाथ शिंदे-अजित दादात शीतयुद्ध सुरूच, आता लोकसभेच्या जागा वाटपावरून पडली ठिणगी

मुंबई, दि. २७ [नितीन तोरस्कर] :- अजित दादा पवार त्यांच्या गटासह राज्यातील शिंदे सरकार मध्ये सहकारी मित्र म्हणून सामील झाले खरे पण महायुती सरकार मध्ये ते सहकारी मित्राच्या भूमिके ऐवजी राजकीय शत्रू म्हणून वावरतांनाच दिसून येत आहेत. कधी कोणत्या तर कधी कोणत्या कारणांवरून सुरू राहणारी त्यांची कुरबुरी बातम्यांचा, चर्चेचा विषय ठरत आली आहे. आता लोकसभेच्या जागावाटपावरुन त्यांनी सुरू केलेली कुरबुरी महायुतीत ठिणगीची भूमिका बजावत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित दादा पवार यांनी लोकसभेच्या जागा वाटपाचा आपला फॉर्म्युला देवेंद्र फडणवीसांकडे सादर केला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराप्रमाणेच तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही एकनाथ शिंदेंना धोबी पछाड देण्याचा डाव अजित पवार यांनी आखला आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी आत्ता पासूनच लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचे बोलल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार भाजप लोकसभेच्या २६ जागा आपल्याकडे ठेवणार असून उर्वरीत २२ जागा शिंदे आणि अजित दादा गटाला देणार आहे. असे झाल्यास अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला प्रत्येकी ११ जागा येतील.

पण अजित पवार फक्त ११ जागांवर समाधान माणण्यास तयार नाहीत. तसेच शिंदे यांच्या वाट्याला जाणाऱ्या मावळ, कोल्हापूर आणि नाशिक या तिन्ही जागांवर अजित दादांनी आपला दावा केला आहे. या दाव्यावर अजित दादा ठाम राहिल्यास लोकसभेच्या जागा वाटपाची ही ठिणगी महायुतीसाठी आगीचा भडका ठरू शकते, एवढे निश्चित.

हेही वाचा

लक्षवेधी