Monday, December 23, 2024
Homeदेश-विदेशतेलंगणा आंदोलनातील शहिदांचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते-अमित शहा

तेलंगणा आंदोलनातील शहिदांचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते-अमित शहा

हैद्राबाद, दि. २७ [वृत्तसंस्था] :- के. चंद्रशेखरराव यांनी केवळ आणि केवळ सत्ता भोगण्यासाठी स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या आंदोलनात उडी घेतली होती. त्यामुळे ते आता तेलंगणा राज्याच्या आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांकडे ही पाहत नाहीत आणि त्या आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्वप्ननांचा ही ते विचार करत नाहीत. पण भाजप यात कुठेही चुकणार नाही. तेलंगणा आंदोलनात शहीद झालेल्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने केला असून सत्तेत आल्यास हा संकल्प पूर्तीस नेण्याचा शब्द देण्यासाठीच मी इथे आलो आहे, असे भावनिक भाष्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मकत्तल येथील एका भव्य प्रचार सभेत केले.

यावेळी पुढे बोलतांना अमित शहा म्हणाले की, “तेलंगणा आंदोलनात मच्छीमारांनी केलेला त्याग, दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. पण मच्छीमारांचे ही योगदान केसीआर विसरले. आता त्यांना मच्छीमारांच्या मागण्यांकडे ही पाहण्यास वेळ नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छीमारांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्यांच्या मदतीसाठी, विकासासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. त्याचा लाभ उचलून तेलंगणातील मच्छीमारांचे आयुष्य सुधारण्याचे कर्तव्य ही केसीआर यांनी पार पाडले नाही. त्यामुळे केसीआर यांचे भान जाग्यावर आणणे आवश्यक ठरते आणि ती जबाबदारी मतदार म्हणून तुम्ही पार पाडा. तुमच्या विकासाची जबाबदारी आम्ही पार पाडू. भाजप सत्तेत आल्यास मच्छीमारांच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देवू.” अमित शहांच्या या सभेला लाभलेली गर्दी उल्लेखनीय होती.

हेही वाचा

लक्षवेधी