जयपूर, दि. २७ [वृत्तसंस्था] :- राजस्थानातील १९९ विधानसभा मतदार संघात दि. २६, रविवार रोजी झालेल्या मतदानाने मागील निवडणुकांतील मतदानाचे उच्चांक मोडीत काढले असून रविवार रोजी तब्बल ७४.९६ मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर मतदार रात्री १२ वाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत ऊभे होते. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याचा प्रघात आहे. त्यानुसार या वेळेस राजस्थानातील गेहलोत सरकार जावून भाजपाचे सरकार सत्तेत येणार असल्याचे संकेत आहेत. त्यास या भरघोस मतदानाने दुजोरा ही मिळत आहे.