तिरूपती, दि. २७ [वृत्तसंस्था] :- पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. भगवान तिरूपतीचे दर्शन घेवून १४० कोटी देशवासीयांच्या आरोग्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे ट्वीट त्यांनी केले. प्राप्त माहितीनुसार तिरूपती बालाजीचे दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेलंगणा विधानसभा निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून ते दोन प्रचार यात्रा आणि रोडशो करणार असल्याचे कळते.