मुंबई, दि. ०४ [प्रतिनिधी] :- विधानसभा निवडणुकीचे निकाल दि. २३ रोजी आले तेंव्हा पासून ‘पुढील मुख्यमंत्री कोण?’ हा प्रश्न राज्यातील जनतेला आणि त्याही पेक्षा तमाम वृत्त वाहिन्या, वृत्त पत्रांना पडला होता. या प्रश्नावर विविध वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्रांकडून नानाविविध सुत्रांचा दाखला देवून नानाविविध नावांची यासाठी चर्चा रवंत करण्यात येत असतांनाच ‘दै. जनजागृती’ ने दि. २९ नोव्हेंबर रोजीच ‘ठरले : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी’ हे वृत्त प्रकाशीत केले होते.
आज ते वृत्त खरे ठरले असून केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे मा. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. या अर्थाने देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री राहणार आहेत. आज दुपारी ०३.३० वाजता महायुती चे तिन्ही प्रमुख नेते याबाबत राज्यपालांची भेट घेवून राज्यपालांना अधिकृतपणे पत्र देणार असल्याचे ही कळते.
फडणवीसांच्या गटनेतेपदी च्या या नियुक्तीने ‘दै. जनजागृती’ च्या दि. २९, शुक्रवार रोजीच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाला असून मुख्यमंत्रीपदा बाबत विविध वृत्त वाहिन्या, वृत्त पत्रांनी आता पर्यंत दिलेल्या बातम्या म्हणजे वावड्या होत्या, हे ही सिद्ध झाले आहे. विविध वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्राप्रमाणेच सामाजिक प्रसार माध्यमातून ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदा बाबत अफवेचे पेव फुटले होते. तसेच राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत ही उलट-सुलट वृत्त देवून विविध वृत्त वाहिन्या आणि वृत्त पत्रांनी राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण कलुषित केले होते.
त्या वातावरणात एकमेव ‘दै. जनजागृती’ने ‘ठरले : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदी’ हे वृत्त प्रकाशीत करत फडणवीस हेच महायुती सरकारचे मुख्यमंत्री होणार, असा दावा केंद्रातील भाजपच्या एका मंत्र्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेच्या दाखल्याने केला होता. त्याच प्रमाणे काही राजकीय घडामोडी घडल्या आणि आज भाजप च्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतपणे घोषणा झाली. प्राप्त माहितीनुसार फडणवीस-३.० सरकारचा शपथविधी उद्या दि. ०५, गुरुवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या आणि भाजप शासीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. फडणवीस सरकार मध्ये भाजपचे २०, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ०८ मंत्री असणार आहेत. तसेच एक मुख्यमंत्री आणि दोन उप-मुख्यमंत्री असे या सरकारचे स्वरूप असणार आहे.