Friday, April 18, 2025
Homeप्रादेशिकआध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या लखमापूरचा सर्वांगीण विकास करणार - सुधीर मुनगंटीवार

आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या लखमापूरचा सर्वांगीण विकास करणार – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ०६ [प्रतिनिधी] :- नागपूर-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा या भागातील अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर म्हणून ओळखल्या जातो. या आध्यात्मिक परिसराचा सर्वांगीण विकास करून या परिसराचा लौकीक वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचा शब्द राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

यादृष्टीने मुनगंटीवार यांनी यापूर्वी ही येथील अंतर्गत रस्ते, बोअरिंग तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांसाठी ०८ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे कळते. परंतु तरी या भागाचा हवा तसा विकास अद्याप बाकी आहे. आध्यात्मिक केंद्र म्हणून जसा या भागाचा लौकीक आहे, तसाच एक आदर्श क्षेत्र म्हणून ही या भागाचा लौकीक होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तसा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी यासाठी आवश्यक तेवढा विकास निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना दिली.

लखमापूर येथील नागरिकांशी संवादित होत असतांना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी, “लखमापूर गावातील नागरिक कठोर परिश्रम करणारे आहेत. मी नेहमीच गरीब, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठीच समाजकारण रूपी राजकारणात आहे. या भागात अनेक समाजोपयोगी कामे आधीही केली असून या कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. लखमापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लखमापूर वासीयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या पाठीशी मी आज ही ऊभा आहे, उद्याही राहील….” असे उद्गार काढले. यावेळी लखमापूर परिसरातील थोरा मोठ्यांची उल्लेखनीय उपस्थिती या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांच्या विक्रमी मताधिक्यांनी होत असलेल्या विजयाची ग्वाही देत होती.

हेही वाचा

लक्षवेधी