चंद्रपूर, दि. ०५ [प्रतिनिधी] :- या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून, महायुती सरकार मधील एक जबाबदार मंत्री म्हणून कार्य करतांना सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ त्यांच्या विधानसभा मतदार संघाचाच नव्हेतर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले असून या जिल्ह्यात विकासाच्या गंगेचा प्रवाह असाच प्रवाहित राहण्याच्या दृष्टीने मुनगंटीवार यांचा विजय अत्यंत महत्वाचा असल्याचे मत व्यक्त करत या भागातील मतदारांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिल्याचे पहावयास मिळत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या गाठी-भेटी, बैठका, सभा, पदयात्रा यावर भर देत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मुनगंटीवार यांच्या प्रचाराची धुरा स्वत: मतदारांनीच सांभाळली असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने युवा वर्गाने मुनगंटीवार यांनी मागील काही वर्षात त्यांच्या मतदारसंघासह एकूणच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी किती निधी आणला, कोण-कोणती विकास कामे केलीत याची माहिती मतदारांना देण्याच्या दृष्टीने प्रचाराची धुरा हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.
ऊर्जानगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधन्याच्या दृष्टिकोनातून मुनगंटीवार आले असता मुनगंटीवार यांनी, “सी.एस.टी.पी.एस. (CSTPS) येथे विद्युत निर्मितीचा ८ वा व ९ वा संच उभारला असल्याचे सांगत. यापुढे ८०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. ऊर्जानगर परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीसाठी १५ कोटी रुपये मंजूर करून दिले. तर ऊर्जानगरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच येथील क्वाॅर्टर्सच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला.” असे म्हणत ऊर्जानगरच्या संपूर्ण विकासासाठी आपण आणखीन निधी देणार असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
यावेळी पुढे बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, “ऊर्जानगर परिसरात सांस्कृतिक भवन व्हावे ही अनेक दिवसांपासून मागणी होती. या मागणीला अनुसरून सांस्कृतिक भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. दुर्गापुर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून या भागामध्ये ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ (PHC) करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले. चंद्रपुरात भेटीदरम्यान पोलीस महासंचालकांनी सदर जिमच्या बांधकामाचे कौतुक देखील केले. विविध समाजासाठी प्रत्येक गावनिहाय सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. तसेच येथील ऊर्जानगर वासीयांच्या मागणीनुसार, उर्जानगर कॉलनीतील दुर्गामाता मंदिराच्या शेडचे मजबूत काम करण्यात येणार आहे.” असेही मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी उपस्थित जागरूक मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार चंद्रपूर रोजगाराच्या बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुढे राहावा यासाठी सुधीर मुनगंटीवार करत असलेले प्रयत्न उल्लेखनीय असे आहेत. याकरिता त्यांनी केलेल्या प्रयत्नातून चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन (CSTPS), कोल माईन्सला वनविभागाची मान्यता तसेच मुल एमआयडीसी येथे विविध उद्योग उभे राहिले आहेत. त्यासोबतच, येथील कंत्राटी कामगारांच्या पाठीशी ही सुधीर भाऊ मुनगंटीवार खंबीरपणे ऊभे राहत आले आहेत.
सुधीर मुंनगंटीवार यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे, कृतीमुळे जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे झाली असल्याचे मतही यावेळी मतदारांनी व्यक्त केले. जिल्ह्याच्या विकासाकरिता मुनगंटीवार यांनी सैनिक शाळा, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मेडिकल काॅलेज, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, बसस्थानके, कार्पेट युनिट, पोलीस स्टेशन,सिमेंट रोड, अभ्यासिका तसेच पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना निर्माण केल्या असल्याचे कळते.