Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकशेवटी व्हायचे तेच झाले, जरांगे पाटील यांनी घेतली माघार !

शेवटी व्हायचे तेच झाले, जरांगे पाटील यांनी घेतली माघार !

जालना, दि. ०४ [प्रतिनिधी] :- अगदी काल सायंकाळ पर्यंत डरकाळ्या फोडणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, “उगीच याला पाड, त्याला पाड….याला निवडणून आण, त्याला निवडणून आण…म्हणत राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही. मराठा आरक्षणा बाबत महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय दोघे ही सारखेच आहेत. त्यामुळे आपण निवडणूक लढणार नाही. ज्यांनी-ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असतील, त्यांनी-त्यांनी आप-आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत….” असे आवाहन मराठा समाजाला करत विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार मनोज जरांगे दि. ०३, रविवार रोजीच आपले उमेदवार घोषित करणार होते. त्यानुसार त्यांनी दि. ०३, रविवार रोजी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना काही विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार, उमेदवार देणार असे सांगितले सुद्धा. तसेच ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार देवू शकणार नाही, त्या-त्या विधानसभा मतदारसंघात ‘त्याचा’ कार्यक्रम करण्यासाठी ‘त्याच्या’ उमेदवारांना पाडायचे, असे ही जाहीर केले. पण या बाबीस २४ तासही उलटून जात नाहीत तोच आज जरांगे पाटील यांनी कमालीची भूमिका बदलत विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले.

आपल्या या आश्चर्य कारक भूमिकेबाबत स्पष्टीकरण देतांना जरांगे यांनी, “आपण मित्र पक्षांसोबत विचार विनिमय करत होतो. पण ठरल्याप्रमाणे आपल्या मित्र पक्षांनी उमेदवारांची यादीच दिली नाही. मग निवडणूक लढायची कशी….?” असा बहाणा पुढे करत निवडणूक रणांगणातून सपशेल माघार घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या या कमालीच्या भूमिका बदलाने मराठा समाजात आश्चर्य व्यक्त केल्याजात आहे. तसेच ज्या-ज्या मराठा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्या-त्या मराठा बांधवांकडून, त्यांच्या समर्थकांकडून जरांगेंच्या या भूमिकेविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

लक्षवेधी