Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकरत्नागिरीत कौशल्य विकास केंद्र

रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्र

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रीतम गंजेवार यांचा सत्कार

रत्नागिरी, दि. २६ [प्रतिनिधी] :- उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कौशल्यविकास केंद्र (Centre for Invention, Innovation, Incubation and Training – CIIIT) प्रकल्पाचे भूमिपूजन येथे करण्यात आले असून या केंद्राद्वारे रत्नागिरी तसेच परिसरातील युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

युवकांतील कौशल्याला संधी उपलब्ध करून देणाऱ्या, योग्य स्थान, प्रतिष्ठा उपलब्ध करून देणाऱ्या या प्रकल्प उभारणीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष घातले होते. या प्रकल्प उभारणीची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक, उद्योजक प्रीतम गंजेवार यांच्याकडे दिली होती. त्यादृष्टीने प्रीतम गंजेवार यांनी टाटा समूह आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार घडवून आणला. केंद्र उभारणीच्या कार्याला मूर्त स्वरूप दिले.

या प्रकल्पाबाबत माहिती देतांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री उदय सामंत यांच्या विचाराने, प्रीतम गंजेवार यांच्या प्रयत्नाने या शिक्षण आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून रत्नागिरी परिसरातील युवकांच्या उज्वल भविष्याचे दरवाजे उघडले आहेत. या केंद्र उभारणीसाठी उद्योजक गंजेवार यांनी जो पुढाकार घेतला, त्याची नोंद म्हणून मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक प्रीतम गंजेवार यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

लक्षवेधी