मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- “दीपक केसरकर अफजलखानाची औलाद असून त्याला बुटाडाने झोडून काढले पाहिजे….” असे जळजळीत वक्तव्य ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानावर त्यांनी हे भाष्य केले.
आज सकाळी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना ते पुढे म्हणाले की, “बरे झाले दीपक केसरकर सारखी माणसे आमच्यातून निघून गेलीत. महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला म्हणतांना यांना लाज वाटली नाही. कारण यांनी ती कधीच विकून खाल्ली. जर पुतळा वाऱ्याने पडला, तर आजूबाजूची झाडे, घरे वाऱ्याने का पडली नाहीत?” एकूणच सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून सुरू झालेल्या राजकारणाने अशी पातळी गाठल्याने महाराष्ट्राच्या राजकारणा विषयी, समाजकारणा विषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.