यवतमाळ, दि. २३ [जया लाभसेटवार] :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील भाजप प्रणित ‘महायुती’च्या उमेदवार राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या विजयासाठी मंत्री संजय राठोड पूर्ण ताकदिनीशी मैदानात उतरले असून या मतदारसंघातील समस्त बंजारा समाज राजश्री ताई यांच्या पाठीशी ऊभा करण्याच्या दृष्टीने त्यांनी यवतमाळ येथे बंजारा समाजातील नायक, कारभारी, डाव, डायसाने यांची सहविचार सभा घेतली. या सभेत त्यांनी, “ही निवडणूक राजश्री ताई लढवत नसून मी लढवत आहे….असे समजून स्वत: ही मतदान करा आणि आपल्या वाड्या, वस्त्या, गावा-गावाला ही मतदान करायला सांगा…” असे आवाहन केले.
या सभेला राळेगाव, बाभुळगाव, कळंब, पांढरकवडा तसेच यवतमाळ शहर-परिसरातील बंजारा समाजातील नायक, कारभारी, डाव, डायसाने यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. या सहविचार सभेत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी, “ही माझ्या बहिणीची निवडणूक नसून माझ्या अस्मितेची, तुमच्या-आमच्या घरच्या माणसाच्या अस्मितेची लढाई होय. आपल्या लेक-बाळीला कोणी परका म्हणून हिणवत असेल तर त्याची जीभ आपण हासडली पाहिजे. पण आपण लोकशाहीचे पूजक आहोत. त्यामुळे अशांना लोकशाही मार्गाने, मतदानातून आपण उत्तर देवून त्यांना धडा शिकवू. आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ताईंच्या रूपाने एक उच्च-शीक्षीत उमेदवार दिला आहे. याचा अभिमान बाळगत आपण आपल्या कल्याणासाठी, आपल्या मूला-बाळांच्या कल्याणासाठी, आपल्या मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी ताईंना निवडून आणण्याचा संकल्प करुयात…” अशा शब्दांत आपले विचार मांडले. यास उपस्थित बंजारा समाजाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जयश्री ताई यांच्या विजायाचा निश्चय व्यक्त केला.
याचे सकारात्मक परिणाम ही लगेच दिसून येत असून बंजारा समाजाच्या नेत्यांनी जयश्री ताईंच्या विजयासाठी आप-आपल्या भागात त्यांच्या प्रचाराची कमान सांभाळत मतदार जागृती सरू केली आहे. मतदानाला अवघे दोन-तीन दिवस शिल्लक आहेत, हे लक्षात घेवून मंत्री संजय राठोड हे स्वत: जयश्रीताई हेमंत पाटील यांच्या विजयासाठी मैदानात उतरल्याने जयश्री ताई यांचे विजयाच्या दिशेने ठोस पावले पडत असल्याची चर्चा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आहे. संजय राठोड यांची या लोकसभा मतदारसंघात जनणायक म्हणून असलेली ओळख, या मतदारसंघातील मतदारांवर त्यांची आपला भाऊ म्हणून असलेली छाप जयश्री ताई पाटील यांची विजयाची वाट सुकर करत असल्याचे पहावयास मिळत आहे. पालकमंत्री असलेल्या राठोड यांनी बंजारा समाजासह ईतर समाजातील ही प्रमुख सामाजिक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून जयश्री ताई पाटील यांच्या विजयाची मोट बांधण्याचे काम नियोजनबद्धरित्या पार पाडले आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या माध्यमातून श्री क्षेत्र पोहरागड, बंजारा भवन, साहित्य अकादमी या कामाबरोबरच युवकांच्या, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपणा सर्वांच्या पाठिंब्याच्या, आशीर्वादाच्या बळावरच हे करणे श्यक्य होत आहे. आपण जसे आशीर्वाद देवून, साथ देवून मला आपल्या सेवेची संधी देता, तशीच संधी आपल्या ह्या भगिनीला द्या. समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या राजकीय विचाराला शक्ती देण्यासाठी सज्ज व्हा, मतदान करा.” असे आवाहन करत राठोड यांनी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित महायुतीच्या उमेदवार जयश्री ताई हेमंत पाटील यांच्या विजयासाठी बैठकांचे, सभांचे, प्रचार फेऱ्यांचे सत्र सुरू केले आहे.
“जयश्री ताई यांच्या विजयाचा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला असून तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे….” असे भावनिक आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना करत पालकमंत्री संजय राठोड स्वत: मैदानात उतरल्याने यवतमाळ-वाशिम लोकसभेचे मैदान जयश्री ताई हेमंत पाटीलच मारणार, अशी चर्चा या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतखंडात रंगतांना दिसून येत आहे.