लेकीचा आजन्म आधार म्हणजे, माहेर. कोणतंच माहेर लेकीला कधीच नाकारत नसते आणि त्यातल्या त्यात राजश्री ताई पाटील म्हणजे तर या यवतमाळ लोकसभा मतदारसंघ रूपी माहेराचे भाग्य उजळवून टाकण्याची क्षमता असणाऱ्या, विविध सामाजिक कार्यातून कायम माहेरच्या माणसांची काळजी वाहत आलेल्या विकासाची कल्पक दूरदृष्टी असलेल्या नेत्या….त्यामुळे यवतमाळ लोकसभा मतदार संघ रूपी माहेर त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपली लेक म्हणून लोकसभेत पाठविण्याच्या निर्णया पर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येत आहे…!
म्हणूनच या लोकसभा मतदार संघातील प्रचारा दरम्यान सामान्य मतदार “लेकीच्या हाती मतदार संघाची दोरी…लेक मतदार संघाला उद्धारी….” अशा घोषणा देत त्यांचा प्रचार करतांना दिसत आहेत. सामान्य मतदारांच्या या घोषणांनी विरोधकांचे धाबे दणाणले असून पाचावर धारण बसलेल्या विरोधकांकडे राजश्री ताई पाटील यांच्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे ते आता राजश्री ताई यांचा उल्लेख ‘बाहेरची….बाहेरची…’ असा करत आहेत. विरोधकांची ही कुत्सीक मानसिकता पुरोगामी महाराष्ट्र कधीच स्वीकारू शकत नाही….लेकीचा ‘बाहेरची…’ म्हणून केलेला उल्लेख माहेरची कोणतीच मंडळी सहन करत नसते…नेमके हेच यवतमाळ लोकसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे…!
अवघा देशच माझा परिवार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला एकसंघतेचा कौटुंबिक सल्ला दिला आहे. संपूर्ण देशवासीयांना आपले कुटुंब सदस्य मानले आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा देश आहे. ‘अवघे विश्वची माझे घर…’ म्हणून संपूर्ण विश्वाला एकरूपतेचे बाळकडू देणाऱ्या संत तुकोबा रायांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला थारा न देण्याचाच संकल्प करून सामान्य मतदार राजश्री ताईंच्या पाठीशी भाऊ म्हणून, बहीण म्हणून, माहेरचा माणूस म्हणून ऊभा राहतांना दिसून येत आहे. त्यांच्या भाषणातून दिसून येणारी त्यांची तळमळ. आपुलकी, विकासाची कल्पक दूरदृष्टी, सामाजिक जाणीव मतदारांच्या मनाचा ठाव घेत आहे.
त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याने प्रभावित झालेला त्यांचा माहेरचा माणूस रूपी सामान्य मतदार “एकदा-दोनदा नव्हेतर तब्बल ७ वेळा यवतमाळच्या या लेकीने महाराष्ट्राची लेक म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्लीतील परेड मध्ये आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. निती आयोगाच्या ‘वुमन ट्रान्सफार्मिंग इंडिया’च्या वतीने जाहीर केल्याजाणाऱ्या देशभरातील कर्तबगार, सामाजिक जाणिवा असलेल्या महिलांच्या यादीत ही आपल्या या लेकीने शंभर महिलांच्या यादीमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन सारख्या लोकाभिमुख प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी ‘मी एक स्त्री बोलते….’ या एकपात्री सादरीकरणातून हजारों, लाखों महिलांचे प्रबोधन केले आहे. मार्गदर्शन केले आहे. समाजकारण, राजकारण या दोन्ही क्षेत्रात आदर्श लोकसेवेचे धैय मनाशी बाळगून त्यांनी समाज कार्याला स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या रूपाने आपल्या यवतमाळला एक उच्च शीक्षीत, विकासाची दृष्टी असलेला खासदार लाभत असेल तर आपण का नाकारावा….? माहेरच्या माणसांची खरी काळजी लेकी पेक्षा कोणी दूसरा घेत असतो का….? याचा विचार करा अन डोळे लावून मोदींच्या स्वप्नातील आदर्श भारत साकारण्यासाठी आपल्या लेकीला, आपल्या जयश्री ताई पाटीललाच निवडणून द्या…” अशा शब्दांत त्यांचा प्रचार करतांना दिसून येत आहे.
एकूणच यवतमाळ लोकसभा मतदार संघाचा प्राचार ना सामाजिक विकासाच्या, ना शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाच्या, ना तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या, ना मृतावस्थेत गेलेल्या यवतमाळ ‘एमआयडीसी’ला पुनर्जीवित करण्याच्या, ना यवतमाळ नगरीला आदर्श शिक्षणाची नगरी करण्याच्या, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा लाभ महिलांना करून देत महिलांना गृह उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर केंद्रीत होतांना दिसून येत आहे. फक्त आणि फक्त ‘घरचा आणि बाहेरचा….’ या मुद्या भोवती घुटमळतांना दिसून येत आहे….!
हा एक प्रकारे शिवसेना पक्षाच्या, भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवार जयश्री ताई पाटील यांचा दृष्टिक्षेपात दिसत असलेला विजय हाणून पाडण्याचा राजकीय उपद्रव होय, हे यवतमाळ लोकसभा मतदार संघातील सामान्य मतदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून देशाच्या सक्षमीकरणासाठी ज्या योजना घोषित केल्या आहेत, त्या योजनांचा फायदा यवतमाळ लोकसभा मतदार संघातील माता-भगिनींना करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या, शेतकरी बांधवांना पारंपारिक शेती व्यवसाया सोबतच आधुनिकतेची कास धरून शेती उद्योग करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे वचन देणाऱ्या, उद्यमी युवकांच्या कल्याणासाठी यवतमाळ ‘एमआयडीसी’ ला पुनर्जीवित करण्याचा शब्द देणाऱ्या, उच्च शिक्षणासाठी परिस्थिती असो-नसो महानगरांकडे जाण्याशिवाय गत्यंतर नसणाऱ्या विद्यार्थ्याना यवतमाळ नगरीतच आदर्श शिक्षण व्यवस्था ऊभी करून देण्याबाबत आश्वस्त करणाऱ्या सामाजिक नेत्या राजश्री ताई पाटील यांनाच आपला खासदार म्हणून लोकसभेत पाठविण्याचे विचार व्यक्त करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष प्रणित महायुतीच्या उमेदवार जयश्री ताई यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.
जया लाभसेटवार…. 🖋️