Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिक"एकमेकांच्या सहकार्याने विकासाच्या गाडीला गती देऊ...."

“एकमेकांच्या सहकार्याने विकासाच्या गाडीला गती देऊ….”

मुनगंटीवार यांचे कुणबी समाजाच्या बैठकीत आवाहन

चंद्रपूर, ता. ११ (विनोद वट्टमवार) :- ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत….’ ही प्रतिज्ञा अंगी बाणून आ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे अनुकरण करत जाती-पातीचा विचार न करता शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, निराधार, बेरोजगार या सर्वांसाठी विविध विकासाचे प्रकल्प राबवून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न मी मागील काही वर्षांत केला. यापुढे ही असेच कार्य माझ्या हातून घडत राहावे, यासाठी आपले सहकार्य महत्वाचे आहे. आपल्या सहकार्याने देशाच्या विकासाच्या गाडीला अधिक गती देता येईल. त्यामुळे आपण आज एकमेकांच्या सहकार्याने विकासाच्या गाडीला गती देण्याचा संकल्प करू, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे [महायुतीचे] उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बुधवार, दि. १० एप्रिल रोजी चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाज मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर मनोहर पाऊणकर, नामदेव डाहुले,किशोर टोंगे, हनुमान काकडे, सुभाष गौरकार, अनील डोंगरे, उत्तम पाटील, पंकज ठेंगारे, अनिता भोयर, वनिता आसुटकर, शोभा पिदुरकर, राकेश गौरकार, मनोज मानकर, देवानंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, “विश्वगौरव नरेंद्र मोदींजी गरीबों के मसिहा जात-पात-धर्म याचा विचार न करता केवळ राष्ट्रविकासासाठी काम करीत आहेत.” जिल्ह्यातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी ते स्वत: चंद्रपुरात आल्याचेही ते म्हणाले. आपण वैद्यकीय उपचार घेताना किंवा दैनंदिन कामे करताना तसेच एव्हाना घर बांधताना जात पाहत नाही मग देशाच्या निर्माणात जात का पाहतो, असा सवाल करीत त्यांनी, “देशातील कुणबी समाजासह प्रत्येक समाज माझा आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी पूर्ण शक्तीने काम करेल.” अशी ग्वाही दिली.

कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने तसेच समाजाच्या सुविधेसाठी अनेक कामे केल्याचा उल्लेखही यावेळी  सुधीर मुनगंटीवार यांनी केला. समाजासाठी १५ कोटी रुपये निधीचा सभागृह मंजूर केले असून गरीबांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, महिला, रोजगार, आशा सेविका, दिव्यांग, ज्येष्ठ, रुग्णांना मदत केली आहे. यापुढेही कुणबी समाजाचा भाऊ म्हणून शेतकऱ्यांसाठी जीवन ओतून काम करेल, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा

लक्षवेधी