Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकउपचारा अभावी अवघ्या २५ वर्षीय गरोदर महिलेचा पोटातल्या बाळासह मृत्यू

उपचारा अभावी अवघ्या २५ वर्षीय गरोदर महिलेचा पोटातल्या बाळासह मृत्यू

पालघर, दि. २० [प्रतिनिधी] :- राज्याच्या अति दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेची किती वाईट अवस्था आहे आणि त्याचे काय दुष:परिणाम अशा भागात राहणाऱ्या रहिवाशांना भोगावे लागतात, याचे प्रमाण देणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा गावात घडली.

पोटात कळा जाणवत असल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या अवघ्या २५ वर्षीय सीमा नामक गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात पोहचता न आल्याने आपला जीव गमवावा लागला. दु:खद म्हणजे, या घटनेत तिच्यासह तिच्या पोटातील बाळाला ही जगात येण्यापूर्वीच जगाचा निरोप घ्यावा लागला. या विषयी रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. गर्भात बाळाचा मृत्यू होऊन जास्त वेळ झाल्याचा घातक परिणाम सदर गर्भवती महिलेवर झाला. त्यामुळे तीचा बीपी वाढून तसेच ईतर समस्या उद्भवून त्यात तीचा ही मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

लक्षवेधी