Monday, December 23, 2024
Homeराजकीयठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानावर 'एसीबी'चा छापा

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानावर ‘एसीबी’चा छापा

रत्नागिरी, दि. १८ [प्रतिनिधी] :- शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या [एसीबी] पथकाने आज सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असून ‘एसीबी’च्या पथकाकडून त्यांच्या घराची झाडाझडती अद्याप ही सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार राजन साळवी यांना यापुर्वी दोन-तीन वेळा ‘एसीबी’ कडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ते ‘एसीबी’च्या अलिबाग येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर ही झाले होते. “एसीबी कार्यालयात हजर राहून आवश्यक ती सर्व माहिती आपण यापूर्वीच ‘एसीबी’ला दिली होती. पण तरी ‘एसीबी’ कडून अथवा ‘ईडी’कडून आपल्या विरुद्ध कारवाई होणार, आपल्या निवासस्थानी, कार्यालयावर छापेमारी होणार याची कल्पना आपल्याला आधीच आली होती. त्यामुळे आज सकाळी जेंव्हा ‘एसीबी’चे पथक आपल्या निवासस्थानी आले, तेंव्हा आपण त्यांचे हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. त्यांना अपेक्षीत असे सर्व सहकार्य आपण केले, करत आहोत.” अशी प्रतिक्रिया या कारवाई बाबत राजन साळवी यांनी दिली.

राजन साळवी यांच्या निवासस्थानासह ईतर मालमत्तांच मूल्यांकन ‘एसीबी’कडून करण्यात येत आहे. या छापेमारीत साळवी यांच्या कुटुंबियांची ही चौकशी ‘एसीबी’ पथकाकडून करण्यात येत असल्याचे कळते. ‘एसीबी’च्या या कारवाईवर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना साळवी यांनी आज परत हे आवर्जून सांगितले की, आपल्या विरुद्ध कोणतीही कारवाई झाली तरी किंवा आपल्याला तुरुंगात टाकले तरी आपण शिवसेनेचा राजीनामा देणार नाही. तसेच आपल्या राजकीय भुमिकेत कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा

लक्षवेधी