Monday, December 23, 2024
Homeशहरशाळेच्या बसने घेतला चिमूकल्याचा जीव, संतप्त जमावाने बस पेटवली

शाळेच्या बसने घेतला चिमूकल्याचा जीव, संतप्त जमावाने बस पेटवली

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ [प्रतिनिधी] :- चॉकलेट घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अवघ्या चार वर्षीय चिमूकल्याचा बळी भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसने घेतल्याची हृदयद्रावक घटना चितेगाव परिसरात घडल्याने संतप्त जमावाने बस चालकाला चांगलाच चोप देत सदर बस पेटविली.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चितेगाव येथील पांगरा रोडवर आज दि. १७, बुधवार रोजी सायंकाळी ०६ :०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत मृत्युमुखी पडलेला शाहरुख पठाण नामक ०४ वर्षीय चिमुकला त्याच्या आईसह चॉकलेट घेण्यासाठी घराबाहेर पडला. दरम्यान तो दुकानावर जात असतांना पांगरा रोडने आलेल्या अग्रसेन विद्या मंदिर शाळेच्या बसने शाहरुख आणि त्याच्या आईला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की, या धडकेत चिमूकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या आईला ही गंभीर दुखापत झाली.

ही हृदयद्रावक घटना घडताच तिथे जमलेल्या लोकांनी बसवर दगडफेक करत सदर बस पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच चितेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बस चालकाला जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. अग्निशमन दलाला पाचारण करून आग विजविण्यात आली. चिमूकल्याचा बळी घेणाऱ्या या घटनेबाबत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

लक्षवेधी