Monday, December 23, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच भाजपशी घरोबा करून राजकारण करावं, हे शरद पवारांचच स्वप्न-प्रफुल पटेल

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच भाजपशी घरोबा करून राजकारण करावं, हे शरद पवारांचच स्वप्न-प्रफुल पटेल

गोपीनाथ मुंडेंनी बैठकीची माहिती बाळासाहेबांना दिल्यामुळे युतीची व्यूहरचना फसली

रायगड, दि. ०१ [मयूर मामीडवार] :- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच भाजपशी घरोबा करून राजकारण करण्याचं स्वप्न शरद पवारांचच होतं. यासाठी अधिकृतपणे एक बैठक ही झाली होती आणि त्या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाचा १६-१६-१६ असा फार्मूला ही निश्चित झाला होता, असा गौप्यस्फोट एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाच्या कर्जत मधील शिबिरात ते बोलत होते. शरद पवारांच्या भाजपच्या जवळीकतेवर प्रकाश टाकत त्यांनी हे ही सांगितले की, भाजप-राष्ट्रवादी युती बाबत राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काही महिन्यातच त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी प्रमोद महाजन, शरद पवार यांची एक बैठक झाली होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह यांच्या सुचनेनुसार झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी-भाजप युतीसाठी सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रमोद महाजन यांच्याकडे दिली होती.

त्यावेळी न होऊ शकलेल्या राष्ट्रवादी-भाजप युतीबाबत पुढे बोलतांना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, “ही युती झाल्यास दिल्लीतील आपले महत्व कमी होईल, या भितीने भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी या बैठकीची माहिती बाळासाहेबांना दिली. बाळासाहेबांना ही माहिती मिळताच बाळासाहेबांनी शरद पवारांवर, राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीकांचा भडिमार सुरू केला. त्यामुळे प्रमोद महाजनांनी या विषयावर बाळासाहेबांशी बोलण्याचे टाळले. परिणामी भाजपशी युती करून महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण करण्याचे शरद पवारांचे स्वप्न पूर्ण व्हायचे राहून गेले.”

पटेलांच्या या दाव्याने शरद पवारांची राजकीय धूर्तता उघड झाली आहे. जे शरद पवार आज अजित दादा पवार यांनी भाजपशी युती केल्याने आगपाखड करत आहेत, तेच पवार भाजपशी युती करून महाराष्ट्राचे-देशाचे राजकारण करण्याचे मनसुबे बाळगूळ होते. हे उघड झाल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अजित दादांविषयी वाढत जाणारा रोष कमी होण्याची श्यक्यता व्यक्त केल्याजात आहे.

हेही वाचा

लक्षवेधी