गुवाहटी, दि. २८ [प्रतिनिधी] :- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलच्या दमदार शतकी खेळीने भारताच्या विजयाची हॅट्रीक साधत मालिका विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरले. मॅक्सवेलचे शतक ऑस्ट्रेलियासाठी ‘मॅचवेल’ करणारे ठरले.
मॅक्सवेल च्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ५ गडी राखून विजय मिळविला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची या मालिकेत वापसी झाली असून आता पुढील दोन सामने चुरसीचे ठरणार आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारताने प्रथम फलंदाजी करत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या [१२३*] बळावर ऑस्ट्रेलियाला ०३ गडी गमावून २२३ धावांचे आवाहन दिले. ऋतुराज गायकवाड ने कर्णधार सूर्यकुमार [३९] आणि तिलक [३१] च्या मदतीने भारताला चांगल्या धावसंख्ये पर्यंत पोहोचवले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक फलंदाजी करत मॅक्सवेल च्या उल्लेखनीय शतकाच्या [१०४*] बळावर ०५ गडी राखून भारतावर विजय मिळविला.