Monday, December 23, 2024
Homeराजकीय'राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष दुजाभाव करणारा पक्ष, भुजबळ साहेब राजीनामा द्या'

‘राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष दुजाभाव करणारा पक्ष, भुजबळ साहेब राजीनामा द्या’

ओबीसी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे भुजबळांना आवाहन

मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्यातून निर्माण झालेला, चिघळत असलेला छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील वाद, त्या वादात भुजबळांचा होत असलेला अवमान आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस नेत्यांचे मौन यामुळे त्रस्त झालेल्या भुजबळ समर्थकांनी छगन भुजबळांना “राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष असून तो आपल्या सोबत दुजाभाव करत आहे. त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देवून नवीन संघटना स्थापन करा.” अशा शब्दांत जाहीर विनंती केली.

आज पुण्यातील फुले वाडा येथे समता भूमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात आले होते. यावेळी शासकीय विश्राम गृहाबाहेर समता परिषदेचे, बहुजन विकास संघटनेचे तसेच ओबीसी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी भुजबळांचा सुरू असलेला अवमान असह्य असल्याचे स्पष्ट करत भुजबळांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. बहुजन विकास आघाडीचे बाळासाहेब कापरे यांनी भुजबळ हे ओबीसीचे राष्ट्रीय नेते असल्याचे सांगत भुजबळांनी आता पक्षपातीपणा करणाऱ्या पक्षासोबत राहण्याऐवजी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असे म्हणत भुजबळांना राष्ट्रवादीचा राजीनामा देण्याची विनंती केली.

हेही वाचा

लक्षवेधी