Monday, December 23, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी आमचीच, अजित पवार गटाचे २६० पाणी उत्तर

राष्ट्रवादी आमचीच, अजित पवार गटाचे २६० पाणी उत्तर

मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा आमचाच असून आम्हीच राष्ट्रवादीचे अधिकृत नेते आहोत, पदाधिकारी आहोत, असा दावा करणारे २६० पानी उत्तर अजित दादा पवार गटाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले.

अजित दादा पवार शिंदे सरकार मध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली. शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीचे ही शकले उडाली. अजित दादा पवार गटाने पक्ष आणि पक्ष चिन्ह ही आमचेच असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला. त्यामुळे या प्रकरणावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाली. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. त्यानुसार तिथे ही या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली.

दरम्यान या प्रकरणावर दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सुनावणी घेवून राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याबाबत पडताळणी करून, तथ्य तपासून, निर्णय घेवून त्याबाबत न्यायालयाला अवगत करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी अजित दादा आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. त्या नोटीसीला आज अजित दादा गटाच्या वतीने २६० पाणी उत्तर देण्यात आले.

या २६० पाणी उत्तरात अजित दादा पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वाधिक लोकनियुक्त प्रतिनिधी, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील हे ही आमच्याच सोबत असल्याने राष्ट्रवादी आमचीच असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी याबाबत त्वरीत निर्णय घेवून पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही ही आमचेच असल्याचे लक्षात घेवून न्याय करावा, असे म्हटले असल्याचे कळते.

हेही वाचा

लक्षवेधी