Monday, December 23, 2024
Homeराजकीयआमदार अपात्रता प्रकरणात सुनील प्रभूंची सलग तीन दिवस उलट तपासणी

आमदार अपात्रता प्रकरणात सुनील प्रभूंची सलग तीन दिवस उलट तपासणी

मुंबई, दि. २८ [प्रतिनिधी] :- विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या आमदार अपात्राता प्रकरणाच्या सूनवणीने वेग घेतला असून सध्या या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दि. २८, मंगळवार रोजी सुरू झालेली त्यांची उलट साक्ष नोंदविण्याचे काम आणखीन दोन दिवस चालणार आहे. जेष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी त्यांची उलट साक्ष घेत आहेत. त्यांच्या सोबतच शिवसेना पक्ष कार्यालयातील कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांची उलट साक्ष ही जेठमलानी घेणार असल्याचे कळते. मागील दोन दिवसांपासून सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. या दरम्यान ते केलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरे देत नसल्याने त्यांची उलट तपासणी आणखीन तीन दिवस चालणार असल्याचे कळते.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावनीत होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेवून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे दि. ३१ डिसेंबर पर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठेवले होते. पण उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या आणि ठाकरे गटाच्या ईतर नेते, कार्यकर्ते, कर्मचाऱ्यांच्या साक्ष प्रक्रिये मध्येच आणखीन किमान ८-१० दिवस जाणार असल्याने विहित मुदतीत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून त्यावर विहित मुदतीत निर्णय घेणे विधानसभा अध्यक्षांसाठी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी