Monday, December 23, 2024
Homeप्रादेशिकओबीसी च्या विरोधात बोलणाऱ्याचे हातपाय कापण्याची हिम्मत ठेवा-बबनराव तायवाडे

ओबीसी च्या विरोधात बोलणाऱ्याचे हातपाय कापण्याची हिम्मत ठेवा-बबनराव तायवाडे

हिंगोली, दि. २६ [प्रतिनिधी] :- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने राज्यात सुरू झालेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चांगलाच चिघळत चालला असून “ओबीसी विरोधात बोलणाऱ्याचे हातपाय कापून त्याला धडा शिकविण्याची हिम्मत ठेवा.” असे जहाल वक्तव्य ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आज इथे केले.

एकीकडे मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे म्हणून मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे ध्रुवीकरण करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या सरसगट आरक्षणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील ओबीसी नेते कंबर कसत आहेत. जरांगे पाटील यांच्या सरसगट आरक्षणाच्या मागणीने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा पोहचू शकते, अशी भीती राजकीय नेते ओबीसी मध्ये निर्माण करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यातूनच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज येथे ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधीत करतांना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली. मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे ही सांगितले की, मंडळ आयोगाच्या अहवालात मराठा समाजाचा उल्लेख ‘फॉरवर्ड कास्ट’ असा करण्यात आला आहे. मराठा समाज कशाने मागासलेला आहे, हेच कळत नाही. मागील काही महिन्यांपासून ओबीसींनी मराठा समाजाचं आरक्षण चोरलं, अशी ओरड करण्यात येत आहे. पण ते कसं चोरलं हे मात्र सांगण्यात येत नाही. आम्हाला चोर संबोधणारे आमची लायकी काढतात. जर आम्ही लायकीचे नाही, तर आमच्या पंगतीला येऊन बसण्यासाठी नको त्या उठाठेवी कशाला करता? असा सवाल ही त्यांनी या प्रसंगी केला.

 

 

हेही वाचा

लक्षवेधी