Wednesday, April 16, 2025
Homeप्रादेशिकमुनगंटीवारांचा कॉल, धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय : धान खरेदीचे पैसे उद्या सायंकाळ...

मुनगंटीवारांचा कॉल, धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय : धान खरेदीचे पैसे उद्या सायंकाळ पर्यंत खात्यावर जमा होणार !

चंद्रपूर, दि. ०५ [प्रतिनिधी] :- राज्याचे मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील काही दिवसांत सर्वसामान्यांच्या प्रश्नांची दखल घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा जो धडाका लावला आहे, त्यामुळे ‘सुधीर मुनगंटीवार म्हणजे तात्काळ दखल, तात्काळ न्याय….!’ अशी चर्चा जनताजणार्धनात सुरू असून याचीच प्रचिती मुनगंटीवार यांच्या आणखीन एका कार्यातून आली आहे.

प्राप्त माहितीनुसार विषय धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान खरेदीच्या रक्कमेचा होता. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून बरेच दिवस उलटूनही गोर-गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे, शेती उत्पादनाचे पैसे मिळत नव्हते. यासाठी त्यांनी जे-जे उंबरठे झिजवायचे, ते-ते उंबरठे झिजविले. पण तरी न्याय काही मिळाला नाही. त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली.

मुनगंटीवारांकडे आपली कैफियत मांडतांना त्या पिडीत शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्यशी ही याबाबत चर्चा करून त्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर देण्याचे सूचित केले. “निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी आधीच तणावात असतो. त्यामुळे आपण असे लहरी वागून त्यांना अधिक संकटात टाकू नये….” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी हनुमंत पवार यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परिणामी पवार यांनी धान खरेदीची थकीत रक्कम उद्या दि. ०६, गुरुवार रोजी सायंकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांना दिले.

एकट्या चंद्रपूर जिल्हयातील एकुण १६ हजार ६६९ धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे ९३ कोटी ९० लाख रुपये पणन महासंघाकडे थकीत असल्याचे कळते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती मालाचे पैसे वेळेत मिळणे दूरच त्यासाठी शासन-प्रशासनाचे उंबरठे झिजवून ही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष खदखदत चालला आहे. या असंतोषाचे रूपांतर स्फोटात होण्यापूर्वी, काही विपरीत घडण्यापूर्वी याबाबीची दखल मुनगंटीवार यांनी घेवून त्यांना अपेक्षीत आश्वासक न्याय मिळून दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांत संतोषाचे, आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा

लक्षवेधी