नांदेड, दि. २० [प्रतिनिधी] :- केवळ नांदेड [दक्षीण] विधानसभा मतदारसंघातच नव्हेतर संपूर्ण नांदेड शहरात तसेच नांदेड ग्रामीण भागातही जन-नायक अशी ओळख असलेल्या नांदेड [द] विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा विजय मागील दोन दिवसात घडलेल्या घडामोडींनी आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या जनतेच्या भक्कम पाठिंब्याने निश्चित झाला असून आज सर्वच स्तरातील मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या विजयावर शिक्का मोर्तब करतील, असे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहेत.
दिलीप कंदकुर्ते यांच्यासाठी अत्यंत जमेची बाब म्हणजे, या विधानसभा मतदारसंघातील सर्वच स्तरातील मतदार “वजीर पाहिले, प्यादे पाहिले….नाही कामी कोणतीच दवा, तुमच्या-आमच्या प्रगतीसाठी दक्षीणचा वाघ हवा…!” अशा घोषणा देत कंदकुर्ते यांच्या विजयासाठी स्वत: त्यांचे प्रचारक म्हणून निवडणूक रणांगणात उतरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नाहीतर “दोन वेळा चुकलो, यावेळी चुकणार नाही….भाऊंच्या विजयासाठी मतदारसंघातील शेवटचे मत होई पर्यंत थकणार नाही…!” असा प्रण करत दिलीप कंदकुर्ते यांच्या विजयासाठी त्यांचा सामान्यातील-सामान्य कार्यकर्ता आज मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील प्रत्येक बुथवर सक्रिय राहणार असल्याचे कळते.
कंदकुर्ते यांच्या स्वभावातील दिलदार पणामुळे ‘डीके’ [दिलदार कंदकुर्ते] नावाने सुपरिचित कंदकुर्ते यांची नांदेड भागातील जनसामान्यात लोकनेते म्हणून ख्याती आहे. त्यांच्या पाठीशी असलेला जनाधार आणि त्यांच्या सोबत असलेली जिवाभावाची माणसे, जिवावर उदार होऊन त्यांच्यासाठी कार्य करणारी कार्यकर्त्यांची सक्षम फळी या बळावर मागील दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाला जवळपास गवसणी घातली होती. पण विजयी माळेने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली.
आपल्यासाठी रात्री-बेरात्री धावून येणारा आपला नेता दोन्ही वेळा थोडक्यात आमदार होता-होता राहिला, ही सल या विधासभा मतदारसंघातील जनसामान्यांच्या मनात घर करून राहिली. ह्या सलेचे रूपांतर अस्मितेच्या लाटेत झाल्याने सुद्धा दिलीप कंदकुर्ते यांच्या विजयावर शिक्का मोर्तब होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सामान्यातील-सामान्य मतदार “शेगडीच चालणार, दिलीप भाऊच निघणार….” असे म्हणत आहेत.