Sunday, December 22, 2024
Homeप्रादेशिकलाडकी बहीण योजना आत्ता आली, आम्ही फारपूर्वी पासून आमच्या भाऊंच्या लाडक्या बहिणी...

लाडकी बहीण योजना आत्ता आली, आम्ही फारपूर्वी पासून आमच्या भाऊंच्या लाडक्या बहिणी !

बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील कौल सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजूने

बल्लारपूर, दि. १५ [प्रतिनिधी] :- विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्यात महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात महायुतीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक वातावरण दिसून येत असून भाजप प्रणित महायुतीची बल्लापूर सीट म्हणजे, निघालेली सीट! अशी जोरदार चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे.

यास कारण ही असेच असून येथील उच्चशीक्षीत महिला मतदार अश्विनी रासेकर यांनी दिलेली “विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्यात विविध विधानसभा मतदारसंघात विविध उमेदवार विजयासाठी नानाविविध क्लूपत्या लढवत आहेत. पण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील असा एकमेव विधानसभा मतदारसंघ असेल की जीथे भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार असलेल्या सुधीर मुनगंटीवार ह्यांना विजयासाठी कोणतीही क्लूप्ती लढविण्याची आवश्यकता भासत नाही आणि तशी कोणतीही क्लूप्ती लढवितांना ते दिसून ही येत नाहीत. कारण त्यांच्या विजयासाठी आमच्या सारख्या शेकडो बहिणी आणि हजारों कार्यकर्ते, हजारों मतदार स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.” ही बोलकी प्रतिक्रिया याचेच द्योतक होय.

मागील सात-आठ दिवसांपासून ‘दै. जनजागृती’ च्या वतीने या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणून घेण्यात येत आहे. यादरम्यान अशोक जाधव यांनी दिलेली, “सुधीर मुनगंटीवार यांनी विविध विकास कामांद्वारे त्यांच्या विधासभा मतदारसंघासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा बदललेला चेहरा, केवळ निवडणूक काळातच नाही तर केंव्हाही आपल्या मतदारांच्या संपर्कात राहण्याचा, त्यांच्या सुख-दु:खात धावून जाण्याचा मुनगंटीवार यांच्या अंगी असलेला मदतभाव. यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची या विधानसभा मतदारसंघावर नुसती पकड नसून या विधानसभा मतदारसंघासह त्यांची आणि त्यांच्यासह या विधासभा मतदारसंघाची नाळ बांधलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.” ही प्रतिक्रिया ही बरेच काही सांगून जाते.

अनेक महिला मतदारांनी “राज्यशासनाची लाडकी बहीण योजना तर आत्ता आली….पण आम्ही मात्र फार पुर्वी पासूनच आमच्या सुधीर भाऊंच्या लाडक्या बहिणी आहोत…” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. एकूणच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा विजय निश्चित आहे, असेच यातून स्पष्ट होत आहे.

 

हेही वाचा

लक्षवेधी