Sunday, December 22, 2024
Homeराजकीयआमदार झालो तर कमीशन खाणारा आमदार होणार नाही- अपक्ष उमेदवार माधव जाधव

आमदार झालो तर कमीशन खाणारा आमदार होणार नाही- अपक्ष उमेदवार माधव जाधव

प्रतिनीधी : विनोद वट्टमवार

अहमदपूर : निवडणुकीचे बिगुल वाजले असताना प्रत्येक उमेदवार पक्षाचा असो की अपक्षाचा सर्वापेक्षा मी वेगळा कसा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न चालू आहे. आज माधव जाधव यांनी रॅली काढून निजवंते नगर मध्ये जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत असताना म्हणाले की, प्रस्थापित आमदारांनी 3500 कोटी रुपयाचे निधी आणला पण हा निधी कमिशन खाऊन या निधीचं वाटोळं केलं कोणत्या गावाला रस्ता व्यवस्थित नाही ना कोणताच विकास झाला नाही मतदारांनी जर मनात घेतले आणि मला आमदार केले तर निधीतून कमिशन खाणारा आमदार हा माधव जाधव होणार नाही. असे मत अपक्ष उमेदवार माधव जाधव यांनी मांडले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी पुरोगामी विचाराचा असल्यामुळे अपक्ष म्हणून लढणार पण कुणाची गुलामगिरी पत्करणार नाही व कोणाला गद्दारी करणार नाही मी जर निवडून आलो तर भारतीय जनता पार्टीत कदापि जाणार नाही आजी व माजी या दोन्ही आमदारांनी जनतेचा विश्वासघात करून एक अपक्ष म्हणून निवडून आले, आणि बीजेपी मध्ये गेले त्यांना धडा शिकवण्यासाठी दुसऱ्याला निवडून दिले तर दुसऱ्याने पण जनतेला विश्वासात घेऊन जनतेचा गळा कापला व भारतीय जनता पार्टीच्या मांडी लावून बसले. व जनतेसोबत गद्दारी केली पण मी निवडून आलो तर मी पुरोगामी विचाराचा असल्यामुळे भारतीय जनता पार्टीत जाऊन जनतेची दिशाभूल करणार नाही त्यांनी आई-वडिलांच्या शपथीवर सांगितले.

बाकीचे आमदार हे स्वतःच्या स्वार्थासाठी आमदारकी करतात ते जनतेला वेळ देऊ शकत नाहीत सर्वसामान्य नागरिकांना भेटायचं म्हणलं तर त्यांना कार्यकर्त्याची गरज पडते त्यांना मध्यस्थी घालून मगच सर्वसामान्य मतदाराला त्यांना भेटता येते पण मला जर भेटायचे असेल तर कोणत्याच कार्यकर्त्याला मधी घालायची गरज नसून डायरेक्ट तुम्ही मला भेटू शकता कारण मी एक सामान्य आणि गरीब तुमच्यासारखाच माणूस आहे मला गरिबीची जाणीव आहे माझे आई-वडील हे वीट भट्टी मध्ये काम केलेले असल्यामुळे गरिबीची जाणीव आहे त्यामुळे गरिबांसाठी काय लागतं या गोष्टीची पण मला जाणीव आहे असे मत माधव जाधव यांनी मांडले

ते पुढे बोलत असताना म्हणाले की साडेतीन हजार कोटी निधी खेचून आणला म्हणजे काय उपकार केला नाही त्यांना निवडूनच त्या कामासाठी दिले होते निधी आणणे ही काही मोठी गोष्ट नाही मला जर आमदार केला तर मी यापेक्षा जास्त निधी आणू शकतो.

माझ्या कामाची जर पावती पाहिजे असेल तर खंडाळी जिल्हा परिषद मध्ये या आणि सर्कलचा झालेला विकास पाहून मी काय करू शकतो याविषयी तुम्ही जाणून घ्या माधव जाधव यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे माणिक जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प धुळगुंडे महाराज हे होते.

हेही वाचा

लक्षवेधी