सोपे नसते माय होऊन जगणे
एका पंखाने उणे झाल्यानंतर ही घरातलं घरपण सांभाळत
चोचीने घास भरवत पाखरांना मोठे करणे
आकाशी भर घेण्यासाठी पाखरांच्या पंखांत बळ आणणे….
अनघा ताई,
तुम्ही हे तर केलेच शिवाय पुसदसह राज्यभरातील ही अनेक पाखरांना आकाशी झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांत बळ दिले….तुमचा आधारस्तंभ असलेला तुमचा जीवनसाथी ईश्वराने तुमच्याकडून स्वत:कडे बोलावून घेतला…त्यानंतरही तुम्ही खचला नाहीत, त्या न भरून निघणाऱ्या दु:खातून स्वत:ला सावरत तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांना ही सावरले….त्यांचे छत्र त्यांच्या पासून ईश्वराने हिरावले, याची उणीव ही त्यांना भासणार नाही अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रातील योगदानाने तुम्ही आपली पुढची पिढी घडवत आहात….
या सोबतच आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो….हा विचार तुम्ही तुमच्या मनावर कोरून ठेवत समाजसेवेत स्वत:ला झोकून दिले…फक्त आपल्याच नाहीतर ईतरही समाजातील दिन-दुबळ्यांसाठी तुम्ही जे सत्कर्म करत आहात, ते शब्दांत मांडता न येणारे आहे….सरस्वती आणि लक्ष्मी प्रसन्न अशा देवदूताबाबत मी पामराणे आणखीन काय मांडावे…?
आई म्हणजे, आई असते….
लेकरांच्या सांभाळासाठी ईश्वराने घेतलेले रूप असते…!
आपल्या या ईश्वरीय कार्यासाठी माई आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा….
-ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार