Sunday, December 22, 2024
Homeलेखआम्हाला माहीत होते....क्रांतिकारकांचा जन्म फासावर चढण्यासाठीच झालेला असतो...!

आम्हाला माहीत होते….क्रांतिकारकांचा जन्म फासावर चढण्यासाठीच झालेला असतो…!

आ. भाऊ,

प्रथमत: आपले शतश: आभार….देवाचे आभार मानायचे नसतात आणि आपण ठरवल तरी आपण आयुष्यात कधीही ते माणण्या एवढे मोठे होऊ शकत नाही…म्हणूनच देव पावला तर आभार मानायचे नसतात, दर्शन घेवून नवस फेडायचा असतो….

ते आम्ही केले….लोकसभा निवडणुकीत आ. भाऊंनी आम्हाला, आमच्या माध्यमाने समाजाला हे आर्थिक विकास महामंडळ स्थापण करण्याचा शब्द दिला, वचन दिले….तेंव्हा आणि आत्ता आज, आम्ही आमच्या विठू रायाचे दर्शन घेवून मनोमन नवस फेडला….

आंदोलनाच्या काळात ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे….’ म्हणत आम्ही जो काही रोष व्यक्त करत होतो, टिका करत होतो….त्या बद्दल ही आम्ही आमच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन मनोमन क्षमा मागीतली…

आत्ता या आनंद प्रसंगी एवढेच सांगेन….हे युद्ध लढतांना, हा लढा देतांना आम्हाला हे माहीत होते की क्रांतिकारकांचा जन्म फासावर चढण्यासाठीच झालेला असतो…हे माहीत असूनही आम्ही हा लढा लढलो…राज्यभरातील तमाम गोर-गरीब बांधवांच्या आशीर्वादाने आणि आमचे, आपले दैवत, आपला पांडुरंग आ. सुधीर भाऊ यांच्या कृपादृष्टीने आपण हा लढा जिंकलो….आपण आंदोत्सव, दीपोत्सव साजरा केला…

राज्यभरातील तमाम समाजबांधवांनी लढवय्या संघर्ष योद्धयांवर अभिनंदनाचा सुरू केलेला वर्षाव अद्याप ही सुरू आहे….त्याबद्दल तमाम आर्य वैश्य बांधवांचे शतश: आभार…

हे आभार मानतांना आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिस्थितीचा विचार न करता, आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून समाजातील गोर-गरीब बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाशी, समाजातील राजकीय-अराजकीय नेत्यांशी तब्बल दहा वर्ष संघर्ष करणाऱ्या, या लढ्यात शेवट पर्यंत जीवाला-जीव देत सहभागी राहिलेल्या नंदकूमार लाभसेटवार, राजकुमार मूत्तेपवार, गोविंद केशवशेट्टी, संतोष उत्तरवार, बालाजी पांपटवार, दीपक भावटणकर, नरेश ऱ्याकावार, सीताराम देबडवार, संतोष फुटाने, विनोद वट्टमवार, राजेशवर पालकृतवार, स्व. प्रवीण दमकोंडवार, पवन मधमशेट्टीवार, किशोर भाऊ नालमवार, सुरेन्द्र कोडगीरवार, वैभव कोडगीरवार, गजानन जिल्हावार, गजानन बेलगमवार, अनिल डूब्बेवार, प्रवीण गादेवार, राजेश कौलवार, अभिजीत चिद्दरवार, जयाताई लाभसेटवार…या सर्व संघर्ष योद्धयांना माझा आमचा मानाचा मुजरा….प्रणाम….!

शेवटी एवढेच सांगेन….

मंजीले भी बहोत थी….रास्ते भी बहोत थे…

पर हमने मंजील ऐसी चुनी,

जो ना हकीकत में थी, ना किसी के ख्वाबों खयालों में….

रास्ता भी हमने बनाया, मंजील भी खुद हमने तरांशी….!

अब जीम्मेदारी आपकी है दोस्तो…!!

हेही वाचा

लक्षवेधी