Monday, December 23, 2024
Homeराजकीय"ती बाई तुम्हाला खुणावेल, डोळा मारेल...पण तुम्ही जायचे नाही...."

“ती बाई तुम्हाला खुणावेल, डोळा मारेल…पण तुम्ही जायचे नाही….”

संजय राउतांनी वाच्चाळतेची परिसीमा गाठली

अमरावती, दि. १८ [प्रतिनिधी] :- दुर्योधनाच्या वाच्चाळतेने महाभारत घडले, कौरवांचा वध झाला, पांडू पुत्र भीमाने त्याचीही मांडी फोडून त्यालाही यमसदनी धाडले. असेच काहीसे मागील जवळपास एका दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असून संजय राऊत रूपी राजकारणातील दुर्योधनाने आज वाच्चाळतेची परिसीमा गाठत “ती नाचणारी बाई आहे. नटी आहे. ती डान्सर तुम्हाला खुणावेल. डोळा मारेल….पण तुम्ही रात्रीच्या खेळास जायचे नाही…” अशा घाण शब्दांत भाजप प्रणित ‘महायुती’च्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरुद्ध गरळ ओकत आपल्या विकृत, विक्षीप्त प्रवृत्तीचे दर्शन घडविले.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आपल्या स्नुषा सुमेत्राताई पवार यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केले. त्याबाबतचा संताप कमी होतो न होतो तोच आज संजय राऊत यांनी असे वक्तव्य केल्याने कॉँग्रेस प्रणित ‘महाआघाडी’ सत्ता प्राप्तीसाठी सर्व मर्यादा, प्रथा परंपरा विसरून कौरवांचे वंशज म्हणून या निवडणूक रणांगणात उतरली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील दोन दिवसांपासून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत अमरावती लोकसभा मतदार संघाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आज आयोजित सभेत मतदारांना, कार्यकर्त्यांना संबोधीत त्यांनी जाहीरपणे असे विकृत भाष्य केले. दुर्दैवी म्हणजे, त्यांच्या या भाष्यावर उपस्थित ‘उबाठा’ पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना हाश्याची उकाळी फुटली.

एकूणच स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार या महाराष्ट्राला देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करत, त्यांच्या नावाने राजकारण करत मतांची भिख मागणाऱ्या शरद पवारांच्या कंपूकडूनच महिलांचा अशा प्रकारे सातत्याने अवमान करण्यात येणे हे दुर्योधनाच्या वंशावळीचे प्रमाण होय, अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेत याबाबत उमटत आहेत.

भगिनींनो यांना मतदानातून उत्तर द्या-सपनाताई मूनगंटीवार 

“माता-भगिनींनो आपण सावित्रीच्या लेकी आहोत. मासाहेब जिजाऊंच्या पूजक आहोत, वैचारिक वारस आहोत. जर रोज कोणीतरी उठून सातत्याने आपल्याला अवमानित करत असेल, आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत असेल तर आपणही मा जिजाऊ होऊन आपल्या मतदान रूपी तलवारीने अशांचा शिरच्छेद केलाच पाहिजे….!” अशा धारधार शब्दांत भाजप नेते सुधीर मूनगंटीवार यांच्या पत्नी सपनाताई मूनगंटीवार यांनी या बाबत आपल्या भावना व्यक्त करत राज्यभरातील महिला मतदारांना मतदानातून याचे उत्तर देण्याचे आवाहन केले. 

हेही वाचा

लक्षवेधी